प्रतिनिधी / शिरोळ
डंपर चोरी करणाऱ्या संतोष अशोक अलकुटे वय ३०, रा. समडोळे मळा, पटेल चौक जयसिंगपूर या चोरट्यास शिरोळ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून २ लाख रुपये किंमतीचा डंपर पोलिसांनी जप्त केला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, ५ सप्टेंबर रोजी युवराज रजपूत यांच्या मालकीचा डंपर नांदणी नाका येथून चोरीस गेला होता. याबाबतची फिर्याद रजपूत यांनी शिरोळ पोलिसांत दिली होती. गुन्हे शोध पथकाने खबऱ्या कडून माहिती मिळताच सापळा रचून संशयित आरोपी अलकुटे यास अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ हनुमंत माळी हे अधिक तपास करीत आहे.