शिरोळ / प्रतिनिधी
महापुराने नुकसान झाल्याने कृषी सेवा केंद्राचे चालक राकेश दादा भगाटे वय वर्ष बत्तीस राहणार नांदणी ता. शिरोळ या तरुणाने बाथरूम मध्ये दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी दहा तीस वाजण्याच्या सुमारास घडली.
या घटनेची वर्दी कुमार जिंनआप्पा भगाटे यांनी पोलिसात दिली असून, अधिक तपास पोलिस पो.हे.कॉ. सागर पाटील हे करीत आहेत.