नांदणी /वार्ताहर
येथील ग्रामपंचायत कर्मचारी आणि अंगणवाडी सेविका यांनी कोरोना महामारीच्या काळात उत्कृष्ट सेवा बजावली आहे. त्यांचा यथोचित सन्मान म्हणून चकोते ग्रुप गणेश बेकरी नांदणी चे उद्योजक अण्णासाहेब चाकोते यांनी एक लाख रुपयाची मदत देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे .या मदतीचा धनादेश आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते नांदणी चे सरपंच सुवर्णा क्षीरसागर यांच्याकडे देण्यात आला.
असो वा महापूर संकट काळात गणेश बेकरी नांदणी च्या चुकीचे ग्रुपने नेहमीच मदतीचा हात पुढे करून सामाजिक कार्य सुरू ठेवले आहे . कोरोना मारीच्या आपत्ती काळातही व्यवसाय बंद असताना घरी बसलेल्या कामगारांना सर्वप्रथम अर्धा पगार आणि कामावर उपस्थित कर्मचाऱ्यांना पंचवीस टक्के पगार वाढ देऊन हातभार लावला आहे. तसेच बेकरी कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्सेनिक अल्बम 30 हे औषध मोफत दिले आहे.
गेल्या तीन महिन्यापासून येथील ग्रामपंचायत पदाधिकारी कर्मचारी आरोग्य विभाग अंगणवाडी सेविका व कर्मचारी जीव धोक्यात घालून उत्कृष्ट सेवा बजावली आहे .त्यांच्या या कार्याची दखल घेऊन उद्योजक अण्णासाहेब चकोते यांनी एक लाखाची मदत दिली आहे .येथील ग्रामपंचायत कर्मचारी व अंगणवाडी सेविका मदतनीस यांना प्रत्येकी एक हजार रुपये उर्वरित रक्कम ग्रामपंचायतीला आवश्यक औषध फवारणी साठी देण्यात आली आहे. या धनादेश प्रधान कार्यक्रमावेळी उपसरपंच अजित पाटील, माजी उपसरपंच विद्या संकेश्वरी ,प्रकाश लठ्ठे ,सुरेश शिरसागर ,दीपा औंधकर ,कल्पना मिरजकर ,विजय माला वायचळ आदी उपस्थित होते.