ऑनलाईन टीम / नांदेड :
लॉकडाऊनमध्ये परराज्यातील नागरिकांना मूळ गावी जाण्याची परवानगी शासनाने दिल्यानंतर नांदेडहून पंजाबमध्ये गेलेल्या लोकांपैकी 351 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे पंजाबमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 741 वर पोहोचला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ सचिन खाल्लाळ यांनी ही माहिती दिली.
नांदेडमध्ये एकाच वेळी 351 जण कोरोनाबधित आढळल्याने गुरुद्वारा, लंगर साहिब आणि संबंधित रुग्णांचे वास्तव्य असलेला संपूर्ण परिसर सील करण्याची प्रक्रिया प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची माहिती घेऊन त्यांची चाचणी करण्यात येणार आहे.
आज सकाळपर्यंत नांदेड जिल्ह्यात 1 हजार 235 संशयितांची नोंद झाली आहे. यामध्ये घेण्यात आलेल्या एकूण 1 हजार 120 स्वॅबपैकी 1 हजार 9 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर 65 जणांचा अहवाल प्रतिक्षेत आहे.