नांद्रे / प्रतिनिधी
नांद्रे व परिसरात बिबट्याचा वावर सुरू असल्याने या परिसरातील नागरिकांनी सर्तक राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नांद्रे,नावरसवाडी, डिग्रज या परिसरात बिबट्याचा वावर सुरू आहे. तरी या परिसरातील नागरिकांनी पहाटे फिरायला जाऊ नये, काळजी घ्यावी व आपल्या मित्र आणि नातेवाईकांना याबाबत माहिती द्यावी. रात्री आपरात्री शेतकर्यांनी शेताकडे जाऊ नये, तसेच दिवसा देखील शेतात जाताना सावधानता बाळगावी, असे येथील नागरिंकांना सांगण्यात आले आहे.