प्रतिनिधी / नांद्रे
महाराष्ट्र शासन व राज्याचे आरोग्य राज्य मंञी राजेंद्र पाटिल यडावकर यांच्या अवहानास प्रतिसाद देत वीर सेवा दल शाखा नांद्रे व नांद्रे ग्रामस्थांच्या वतीने रविवार 10 जानेवारी 2021 रोजी नांद्रे येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. हे महारक्तदान शिबिर यशस्वी करण्याकरिता आण्णासो पाटिल हायस्कूल येथील सभागुहात मिटिगचे नियोजन करण्यात आले होते. वीर सेवा दल मध्यवती समितीचे कायवाह एन. जे. पाटिल सरांच्या अध्यक्षतेखाली नेटके नियोजन मिटिग संपन्न झाली.
गावातील विविध संस्थाचे विविध पदाधिकारी, अधिकारी, मिञ मंडळे, सामाजिक कार्यकर्ते, अॅक्टिव तरूणांच्या विचाराने नेटके नियोजन करण्यात आले. स्वागत व प्रस्थावना वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे सदस्य सुधीर चौधरी यांनी केले. या प्रसंगी बोलताना एन. जे. पाटील सर म्हणाले, सध्या राज्यात रक्ताचा साठा कमी आसल्याने आपण सवानी हे महारक्त दान शिबीर यशस्वी करण्याकरिता प्रयत्न करावे आसे अवाहान केले.
यावेळी प्रमुख पाहुणे मिरज पंचायत समिती सदस्य राहुल सकळे, माजी सरपंच राजगोंडा पाटिल, उधोजक सुदशन हेरले, अमोल पाटिल गाव कामगार, प्रविण शेटे, नेमगोंडा पाटिल, अरविंद कुरणे,प्रदिप मदने,आदि मान्यवर उपस्थित होते. उपस्थिताचे आभार अरूण पाटिल यांनी मानले. हे शिबीर यशस्वी करण्याकरिता वीर सेवा दल चे कायकते प्रयत्न करत आहेत.