थर्टीफर्स्ट्च्या आनंदावर विरजण : लहान व्यावसायिकांनाही फटका
प्रतिनिधी /बेळगाव
राज्यात ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने खबरदारी म्हणून राज्य सरकारने मंगळवार दि. 28 पासून रात्री 10 ते पहाटे 5 या वेळेत नाईट कर्फ्यू जारी केला आहे. नाईट कर्फ्यूमुळे हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून ठप्प असणारा हॉटेल व्यवसाय आताकोठे उभारी घेत असतानाच पुन्हा एकदा नाईट कर्फ्यू लावल्याने व्यावसायिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. अवघ्या काही दिवसांवर थर्टीफस्ट असून, त्याच्या आनंदावरही विरजण पडले आहे.
रुग्णसंख्या वाढून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी राज्य सरकारने नाईट कर्फ्यूचा पर्याय सूचविला आहे. परंतु यामुळे सर्वसामान्यांचे जगणे पुन्हा मुश्कील होणार आहे. हातावर पोट असणारे अनेक व्यावसायिक रात्रीच्या वेळी छोटय़ा टपऱयांमध्ये व्यवसाय करतात. मोठय़ा हॉटेलांमधील व्यवसाय पूर्वपदावर येत असताना नाईट कर्फ्यूची झालेली घोषणा अडचणीची ठरत आहे. केवळ नाईट कर्फ्यू करून कोरोना थांबणार का, असा प्रश्न सर्वसामान्य विचारत आहेत. त्यामुळे या नाईट कर्फ्यूला राज्यभरातील हॉटेल व्यावसायिकांमधून विरोध होत आहे.
थर्टीफस्टच्या आनंदावर विरजण
मागीलवषी कोरोनामुळे थर्टीफस्टच्या सेलिब्रेशनवर निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे यावषी जोरात सेलिब्रेशन करावे, या उद्देशाने अनेकांनी तयारी केली होती. परंतु अशा व्यक्तींचा हिरमोड झाला आहे. रात्री दहा पूर्वीच थर्टीफस्टचा आनंद नागरिकांना घेता येणार आहे. आनंद एकाबाजुला असला तरी ओमिक्रॉनबद्दल दक्षता घेणेही तितकेच गरजेचे आहे. रुग्ण संख्या झपाटय़ाने वाढत असल्यामुळे नागरिकांनी गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.
इतर व्यवसायही अडचणीत
कोरोना व त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे लहान व्यावसायिक देशोधडीला लागले. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे आता कोठे व्यवसाय पूर्वपदावर येत आहेत. आता पुन्हा एकदा नाईट कर्फ्यू लागू केल्यामुळे हॉटेलसह इतर लहान व्यावसायिकांना फटका बसणार आहे. रात्रीच्यावेळी प्रवाशांची वाहतूक करणारे रिक्षाचालक, रेल्वेस्थानक, बसस्थानक परिसरात असणाऱया स्टॉलधारकांनाही या सर्वाचा फटका बसणार आहे.