बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोनाची संख्या वाढत आल्याने प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले हेत. दरम्यान राज्यातील काही शहरात नाईट कर्फ्यू लागू केला जाणार आहे. शनिवार १० ते २० एप्रिल (रात्री १० ते पहाटे ५) दरम्यान कर्नाटक सरकारने शुक्रवारी अधिकृतपणे आदेश जारी केल्यामुळे प्रवाशांना प्रवासाचा पुरावा म्हणून तिकिटे काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
रेल्वे स्थानक, बसस्थानक किंवा विमानतळांवरून कर्फ्यू कालावधीत प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस हा नियम लागू आहे, असे आदेशात स्पष्ट केले आहे. याशिवाय नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्या उद्योगांच्या कर्मचार्यांना रात्री १० च्या आधी त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोहोचण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बेंगळूर, म्हैसूर, बिदर, गुलबर्गा, मंगळूर, उडुपी आणि तुमकूरमध्ये कर्फ्यू लागू असणार आहे.