बेळगाव ठरतेय एअरक्राफ्ट हब
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव विमानतळावरील विमानांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. यापूर्वी विमानतळावर एक विमान नाईट पार्किंगसाठी असायचे परंतु आता त्यामध्ये वाढ होणार आहे. स्टार एअरचे आणखी एक एअरक्राफ्ट बेळगावमध्ये नाईट पार्किंगसाठी दाखल होणार आहे. त्यामुळे बेळगाव विमानतळ हे आता एअरक्राफ्ट हब म्हणून पुढे येत आहे.
प्रवाशांनी दिलेल्या प्रतिसादामुळे बेळगावमधून नवनव्या शहरांना विमानसेवा देण्यात येत आहे. मुंबई, बेंगळूर, पुणे, म्हैसूर, कडप्पा, तिरूपती, इंदूर, अहमदाबाद या शहरांना थेट तर चेन्नई, अजमेर या शहरांना कनेक्टिंग विमानसेवा सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. स्टार एअर 21 डिसेंबरापासून सुरत शहराला विमानसेवा सुरू करीत आहे. त्यामुळे अजून एका विमानाची भर पडणार आहे.
स्टार एअरचे एक एअर क्राफ्ट यापूर्वी नाईट पार्किंगसाठी बेळगावमध्ये असायचे. त्यामुळे सकाळ व संध्याकाळाची विमानसेवा बेळगावला मिळत होती. आता स्टार एअरच्या ताफ्यात आणखी एक एअरक्राफ्ट दाखल होत असून ते देखील बेळगावमध्ये नाईट पार्किंगसाठी येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे बेळगावच्या प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी असून यामुळे फेऱयांमध्ये अजून वाढ होण्याची शक्मयता वर्तविण्यात येत आहे.
राजेशकुमार मौर्य (संचालक- बेळगाव विमानतळ)
बेळगावमधील प्रवाशांची संख्या वाढत असल्याने विमान कंपन्या नव्या शहरांना सेवा देवू लागल्या आहेत. यापूर्वी बेळगावमध्ये एक विमान नाईट पार्किंगसाठी असायाचे आता त्यामध्ये आणखी विमानाची भर पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.