प्रतिनिधी /महाबळेश्वर :
महाबळेश्वरपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या नाकिंदा या गावात राहत्या घराच्या बाजूच्याच भितीवरून बिबटय़ा जात असल्याचे सीसीटिव्हीत कैद झाले आहे. त्यामुळे गाव परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
महाबळेश्वर येथील केटस पॉईटच्या शेजारी नाकिंदा हे गाव वसलेले गावांच्या चारही बाजूने घनदाट जंगल आहे. या परिसरात अनेक वन्य प्राण्याचे दर्शन होते परंतु हा बिबटय़ा मानवी वस्ती दाखल झाल्याची पहिलीच घटना आहे. नाकिदा गावामध्ये राहणाऱया दादू भाई पटेल याच्या घराच्या परिसरात सोमवारी रात्री अकरा वाजल्याच्या दरम्यान सीसीटिव्ही कॅमेऱयामध्ये घराच्या बाजूच्याच भिंतीवरून जात असताना तर दुसऱया कॅमेरात घराच्या समोरील कॅमेरात त्याचे चित्रीकरण कैद झाले. बिबटय़ा मानवी वस्ती दिसण्याची ही पहिलीच घटना आहे. यामुळे नाकिदा या गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मानवी वस्तीत बिबटय़ाचा वावर वाढत असल्यामुळे वनविभागाने याची दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांमधून होवू लागली आहे.