प्रतिनिधी / सातारा
सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. या सरकारमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना आहे. मात्र, साताऱयातल्या पोवई नाक्यावर राहुल प्रियांका गांधी काँग्रेस सेना या नावाचा सातारा पालिकेची परवानगी न घेता फ्लेक्स लागल्याची चर्चा आहे. बोर्डवरील नावामुळे राजकारण्यांचे लक्ष विचलित होत आहे. विशेष म्हणजे राहुल प्रियांका आणि गांधी काँग्रेस पुन्हा सेना असे सर्वच शब्द एकाच मथळयात आल्याने हा कोणता नवा पक्ष व काँग्रेसचे चिन्ह असल्याने काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा बोर्डवर साधा उल्लेखही नाही.
सातारा शहरात अनेक फ्लेक्स विनापरवाना लागत असतात. त्यापैकीच हाही विनापरवाना फ्लेक्स लागल्याची चर्चा आहे. त्या फ्लेक्सकडे पाहिल्यावर महाविकास आघाडीमधील दोन पक्षांच्या नावांचा वापर दिसून येत असून काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांचे फोटो आणि नावे आहेत. त्यांच्या नावाचा आणि आडनावांचा वापर करुन हा फ्लेक्स लागला आहे. फ्लेक्सवर जिह्यातील काँग्रेसच्या नेत्यांची नावे नाहीत. त्यामुळे हा नवीन पक्ष कोणता अशीच चर्चा सुरु झाली असून हा फ्लेक्स जर विनापरवाना लागला असेल तर त्यावर पालिका केव्हा कारवाई करणार अशीही चर्चा सुरु आहे.