कोरोना संसर्गामुळे मास्क अतिशय महत्त्वाचा आणि अनिवार्यही झाला आहे. घराबाहेर पडल्यावर ते लावणे आवश्यक आहे, परंतु जास्त वेळा लावल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. याशिवाय बाहेर जेवतानाही मास्क काढावा लागतो. या समस्येवर दक्षिण कोरियातील एका कंपनीने विशेष मास्क शोधून काढला आहे. आगळय़ावेगळय़ा डिझाईनमुळे हा मास्क सध्या बराच चर्चेत आहे.
हा अनोखा मास्क दक्षिण कोरियाच्या एटमन कंपनीने बनवला आहे. ‘कोस्क’ असे या मास्कचे नाव आहे. हा संपूर्ण मास्क असला तरी आवश्यकतेनुसार पूर्णपणे परिधान करा किंवा तो दुमडून परिधान करा अशा पद्धतीने त्याची रचना करण्यात आली आहे. ज्यांना मास्क लावल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो त्यांच्यासाठीही हे फायदेशीर आहे. हा मुखवटा अनेक ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. त्याला केएफ80 मास्कचा टॅग देण्यात आला आहे. यामध्ये कोरियनसाठी ‘के’ आणि फिल्टरसाठी ‘एफ’चा वापर करण्यात आला आहे. हा मास्क 80 टक्केपर्यंत सुरक्षित असल्याचा कंपनीचा दावा आहे.