प्रतिनिधी / नागठाणे
नागठाणे (ता.सातारा) येथील व्यापारी संकुलाआड सुरू असलेल्या चोरट्या दारूविक्री अड्ड्यावर बोरगाव पोलिसांनी कारवाई करत ५,२५२ रुपये किमतीची देशी दारू जप्त केली. अवैध दारूविक्री करणारा गोट्या उर्फ सागर बाबासो मोहिते (रा.नागठाणे, ता.सातारा) हा पोलिसांना पाहताच पळून गेला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील श्रीराम व्यापारी संकुलाच्या जिन्याआड चोरटी दारूविक्री होत असल्याची माहिती बोरगाव पोलिसांना समजली.पोलिसांनी तेथे अचानक छापा टाकला. यावेळी पोलिसांना पाहून गोट्या उर्फ सागर मोहिते याने मुद्देमाल तेथेच टाकून पलायन केले. पोलिसांनी तेथून ५,२५२ रुपये किमतीच्या देशी दारूच्या १०१ बाटल्या जप्त केल्या.