ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर घडतायत प्रकार
प्रतिनिधी / पलूस
काही दिवसांवर नागठाणे येथील ग्रामपंचायतीची निवडणूक आली आहे. त्या पार्श्वभूमीवर गावात भानामतीचे प्रकार सुरू झाले आहेत. या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
काही महिन्यांपूर्वी नागठाणे येथील एका धार्मिक स्थळ परिसरात चाळीस देशी कोंबड्या तितकेच लिंबू, खिळे, सुया, विशिष्ट रंगाचे कापड, भात असा भानामतीचा प्रकार समोर आला होता. आता गणेशनगर भागातील अस्थिकलश सदृश्य मडके आढळून आले आहे. त्यामुळे नागठाणे परिसरात त्याची भितीदायक चर्चा सुरू आहे. निवडणूक आली की असे प्रकार घडत असल्याचा लोकांना अनुभव आहे. दरवेळी नागठाणे येथील ग्रामपंचायत निवडणूक अटीतटीची असते. निवडणूकीचे वारे वाहू लागले की मग भानामती करणारे अज्ञात घटक असे प्रकार घडवून आणतात.