प्रतिनिधी/ नागठाणे
सातारा तालुक्यातील नागठाणे येथील फिरस्ते परप्रांतीयांवर लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली होती.याबाबत वृत्तपत्राच्या माध्यमातून नागठाणे येथील पत्रकारांनी ही बाब निदर्शनास आणून देताच समाजातील विविध घटकांमधून या लोकांच्या मदतीसाठी अनेक हात सरसावले.बोरगाव पोलीस,ग्रामपंचायत नागठाणे व नागठाणे भाग पत्रकार संघ यांच्या माध्यमातून काही दानशूर लोकांनी या परप्रांतीयांसाठी मदत पाठविली.नुकतीच ही मदत उपासमार होणाया परप्रांतीय व अन्य गरजू लोकांपर्यंत पोहचविण्यात आली.
कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर देशासह महाराष्ट्रात लॉक डाऊन करण्यात आल्याने नागठाणे परिसरात हातावर पोट भरणाया व परप्रांतातून आलेल्या अनेक कुटुंबांची अवस्था दयनीय झाली होती.या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली.याबाबत नागठाणे विभागातील पत्रकारांनी वृत्त प्रसिद्ध केले होते.
या वृत्ताची दखल समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी घेतली.यावेळी बोरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि चंद्रकांत माळी व नागठाणे विभाग पत्रकार संघ यांच्याशी संपर्क साधून मदत पोहचवली. नुकतीच ही मदत नागठाणे येथील फिरस्ते परप्रांतीय लोकांना सपोनि चंद्रकांत माळी,पीएसआय वर्षा डाळींबकर व नागठाणे विभाग पत्रकार संघाने वितरित केली.या उपक्रमास जननेते मनोजदादा घोरपडे (मत्यापुर),पंकज हंबीरराव महाडिक (निनाम),दत्तात्रेय विष्णू ढाणे (बोरगाव),महेश शशिकांत नावडकर (आपशिंगे),अब्दुल इब्राहिम सुतार,गोपाळ क्षेत्री(नागठाणे) यांनी मदत केली.
याचबरोबर नागठाणे ग्रामपंचायतीने स्थानिक व्यापायांना आवाहन केल्यानंतर त्यांनीही मदतीचा हात पुढे केला.यावेळी ग्रामपंचायतीने सुमारे 90 कुटुंबियांना महिनाभर पुरेल असे अन्नधान्य किट तयार करून सरपंच विष्णू साळुंखे व ग्रामपंचायत सदस्यांनी गरजू व गरीब कुटुंबाना वितरित केली.