प्रतिनिधी / बेळगाव
बेकिनकेरे येथील नागनाथ को-ऑप. पेडिट सोसायटीच्यावतीने ग्राम पंचायतीवर निवड झालेल्या नूतन ग्राम पंचायत अध्यक्ष-उपाध्यक्ष व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बेकिनकेरे ग्रा. पं. च्या नवनिर्वाचित अध्यक्षा छबुताई कांबळे, उपाध्यक्षा गंगुबाई गावडे, सदस्य बळवंत भोगण, भावकू सावंत, जोतिबा धायगोंडे, लक्ष्मी गावडू गावडे, लक्ष्मी सोमनाथ सावंत, मल्लाप्पा पाटील, भरमा व्हरकेरी, विद्या पाटील, शांता मण्णूरकर, राजू सावंत, कल्पना कांबळे यांचा शाल, स्मृतिचिन्ह देऊन माजी आमदार संजय पाटील यांनी सत्कार केला.
यावेळी ग्रा. पं. माजी अध्यक्ष अर्जुन डोंबले म्हणाले, पक्ष विसरून गावातील विकासाला प्राधान्य द्या, गोरगरीब जनतेपर्यंत विविध योजना पोहचवून जनतेचा उद्धार करा, असे सांगून नवनिर्वाचित सदस्यांना वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सोसायटीचे चेअरमन अंबाजी सावंत, उपाध्यक्ष सोमनाथ सावंत, संचालक आनंद धायगोंडे, गंगाराम सावंत, मल्लाप्पा गावडे, चंद्रकांत भोगण, नागेंद्र राजगोळकर, नारायण सावंत, सुनीता भोगणसह सल्लागार राजू गवीमठ, गंगाराम लक्ष्मण सावंत, कृष्णा सावंत, रमेश शिंदोळकर, लक्ष्मण शिंदोळकर, परशराम भातकांडे, बळवंत सावंत, लक्ष्मण गडगाणे, संजय पाटील, भाग्यश्री तोरे, नागेश्वरी भडांगे, देमाणी गावडेसह ग्रामस्थ उपस्थित होते.