प्रतिनिधी /शाहूपुरी
श्रावणाबरोबरच उत्सवपर्व सुरू झाले असून पंचमीच्या पार्श्वभूमीवर विशेषतः महिला वर्गामध्ये उत्साहाला उधाण आले आहे. नागपंचमीसाठी प्रतीकात्मकनागतसेच नागनरसिंहाच्या प्रतिकृती, पूजा साहित्य, प्रसादाच्या लाह्या आदी साहित्याची बाजारपेठेत रेलचेल वाढली आहे. यावर्षदिखील नागपंचमीचा सण कोरोनाच्या सावटाखाली साजरा होणार असला तरी सण साजरा करण्याचा उत्साह कायम आहे.
श्रावणाबरोबर सण समारंभांना प्रारंभ होतो. श्रावणातील पहिलाच नागपंचमीचा सण येत असल्याने विशेषतः महिला वर्गामध्ये उत्साह वाढला आहे. शुक्रवारी दि. 13 रोजी नागपंचमीचा सण साजरा होणार असून नागपंचमीसाठी प्रतिकात्मक
नाग तसेच नागनरसिंहाच्या प्रतिकृती, पूजा साहित्य, प्रसादाच्या लाह्या आदी साहित्याची बाजारपेठेत रेलचेल वाढली आहे. सातायात राजवाडा,खणआळी, पाचशेएक पाटी, जिल्हा परिषद चौक, बसस्थानक परिसरात नागपंचमीचे साहित्य विक्रीसाठी आले आहे. यावर्षदिखील कोरोनाच्या सावटाखालीच नागपंचमीचा सण साजरा होणार आहे. तरी देखीलमहिला वर्गामध्ये सणाचा उत्साह कायम आहे. महिलांची खरेदीसाठी बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी गर्दी झाली आहे.