- बाधितांनी ओलांडला 2.91 लाखांचा टप्पा
ऑनलाईन टीम / नागपूर :
नागपूरमध्ये संसर्ग वाढीचा आलेख दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. रुग्णांनी आतापर्यंत 2.91 लाखांचा टप्पा पार केला आहे. त्यातच आज दिवसभरात तब्बल 6,826 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 65 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 91 हजार 043 वर पोहोचली आहे.
दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्ण संख्येमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. दरम्यान, आज दिवसभरात 3,518 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 2 लाख 24 हजार 078 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
- 61 पेक्षा अधिक ॲक्टिव्ह रुग्ण
सद्य स्थितीत नागपूरमध्ये 61,062 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 5,903 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला.