ऑनलाइन टीम / मुंबई :
राज्यातील सहा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. यामध्ये पालघर, नागपूर, धुळे, नंदुरबार, अकोला आणि वाशिम या जिल्हा परिषदांचा समावेश आहे. या सहा जिह्यात काल मतदान झालं होतं. आज सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरु झाली आहे.
नागपूर जिल्हा परिषदेत निवडणुकीतही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, येथे गडकरी आणि बावनकुळे यांना धक्का बसला आहे.
गडकरींच्या धापेवाडा या त्यांच्या मूळ गावी काँग्रेसचे महेंद्र डोंगरे यांनी विजयी मिळवला आहे. तर बावनकुळेंच्या कोराडी जिल्हा परिषद सर्कलमधून काँग्रेसचे उमेदवार नाना कंभाले विजयी झाले आहेत.
दरम्यान, राज्याचे आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी यांचा तोरणमाळ गटातून पराभव झाला आहे. शिवसेनेचे गणेश पराडके यांनी केला एक हजार मतांनी त्यांचा पराभव केला आहे.