ऑनलाईन टीम / नागपूर :
नागपूरमध्ये संसर्ग वाढीचा आलेख वाढताच असून आज दिवसभरात 3,177 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 55 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 21 हजार 997 वर पोहोचली आहे. सद्य स्थितीत 38,298 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्ण संख्येमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. दरम्यान, आज दिवसभरात 2600 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 1 लाख 78 हजार 713 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान, कोरोनामुळे आतापर्यंत 4,986 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला. या पार्श्वभूमीवर नागपूरमधील निर्बंध 31 मार्चपर्यंत कायम ठेवण्यात आले आहेत.