प्रतिनिधी / मिरज
नागपूर – कोल्हापूर आणि कोल्हापूर – नागपूर या आठवड्यातून दोनवेळा धावणाऱ्या विशेष रेल्वे गाड्या 27 एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. 27 तारखेनंतर या गाड्या पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर ते नागपूर मार्गावर सोलापूर मार्गे धावणारी द्विसाप्ताहीक एक्सप्रेस काही कारणासाठी पुढील आठवड्यात धावणार नाही. रेल्वे प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली. या मार्गावर सोमवार आणि शुक्रवारी कोल्हापूरहून नागपूरकडे जाणारी तर मंगळवार आणि शनिवारी नागपूरहून कोल्हापूरकडे रेल्वे गाडी धावते.
मात्र, लॉकडाऊन आणि या मार्गावरील तांत्रिक कारणास्तव ही रेल्वे गाडी पुढील आठवड्यात रद्द करण्यात आली आहे. नागपूर-कोल्हापूर एक्सप्रेस ही 24 तारखेपर्यंत तर कोल्हापूर-नागपूर एक्सप्रेस ही गाडी 27 तारखेपर्यंत रद्द करण्यात आली आहे. यामुळे ऐन लॉकडाऊनच्या काळात उत्तर आणि मध्य भारतात जाणाऱया कामगार आणि प्रवाशांची गैरसोय होणार आहे.