प्रतिनिधी / बेळगाव
आपल्या समाजात प्राणीमित्रांना दैवत मानण्याची परंपरा आहे. त्यामुळे नागपंचमीसारख्या सणाच्या निमित्ताने नागदेवतेचे पूजन करण्यात येते. समाजात सापांविषयी अनेक गैरसमज आहेत. मात्र साप हा माणसाचा शत्रू नसून मित्र आहे. काबाडकष्ट करून शेतकऱयांनी पिकवलेल्या धान्याचे उंदीर नासधूस करतात. उंदीर हे सापाचे खाद्य असल्याने साप उंदरांची संख्या कमी करून शेतकऱयांना मदतच करतात. नागपंचमीदिवशी भाविक नागमूर्तीची पूजा करतात. या पार्श्वभूमीवर शहरातील मूर्तिकार नागमूर्ती तयार करण्यात गुंतल्याचे चित्र दिसत आहे.
नागपंचमी हा श्रावण महिन्यातील पहिला सण. अवघ्या महिनाभरावर हा सण येऊन ठेपला आहे. मूर्तींना रंग लावण्याचे काम सध्या सुरु आहे. बेळगावमधून या तयार नागमूर्ती रायबाग, गोकाक यासह अनेक भागात पाठविल्या जात आहेत.
पर्यावरणाला पूरक ठरतील अशा शाडूच्या मूर्ती बनविल्या जात आहेत. बाजारातदेखील विक्रीसाठी त्या लवकरच दाखल होणार असून छोटय़ा नागमूर्तीची किंमत 35 ते 45 रुपयांपर्यंत असून मोठय़ा नागमूर्ती 45 रुपयांच्यापुढे
आहे.