प्रतिनिधी / पलुस
नागराळे येथे नूतन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना पहिल्याच दिवशी विकास कामाच्या निधीची भेट. नागराळे येथे काल दि.१६ फेब्रुवारी रोजी सरपंच व डे. सरपंच पदांची निवड झाली व लगेच आज दि. १७ फेब्रुवारीला महाराष्ट्र राज्यचे राज्यमंत्री विश्वजीत उर्फ बाळासाहेब कदम यांच्यावतीने तब्बल २७ लाख रु. चा निधी मंजूर झाला.
आज मा. विश्वजीत उर्फ बाळासाहेब कदम यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून मा. यादव साहेब व त्यांची टीम नागराळे ग्रामपंचायतमध्ये उपस्थित झाल्यानंतर सत्काराचा कार्यक्रम झाला. निधीची पत्रे नूतन सरपंच वनिता पाटील व डे. सरपंच इंद्रजित पवार यांच्या स्वाधीन केली. निधी नागराळे येथील जुना कुंडल रस्ता दुरुस्तीसाठी २० लाख व गावातील स्मशानभूमी दुरीस्ती साठी ७ लाख असा आहे.