प्रतिनिधी/ सातारा
जिह्यात कोरोनाने कहर केला असून बाधितांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर रेन झोन वगळता इतर झोन मधील लॉकडाऊनचे नियम शिथील करण्यात आले आहेत. तरी सुद्धा लोकांना घालून दिलेले नियम मोडले जात आहेत. सातारा शहरात मनमानी कारभार वाढल्याचे वारंवार समोर येत आहे. प्रत्येक चौकात पोलीस, होमगार्ड तैनात आहेत. नियम मोडणाऱयावर कारवाई सुरू आहे. मात्र हम करे सो कायदा असे म्हणत सातारकर बेभान होऊन नियमांचे उल्लघंन करत आहेत.
1. पोवईनाक्यावर आयो जाओ घर तुम्हारा…
लॉकडाऊनच्या काळात शहरातील मुख्य रस्ते बंद करण्यात आले होते. पोवईनाका येथून कर्मवीर पथ कडे येणारा मार्ग बॅरिक्टेस् लावून बंद करण्यात आला होता. वाहनधारकांना करंजे मार्ग बुधवार नाका असा शहरात प्रवेश करावा लागत होता. यामुळे वाहनधारक प्रवास टाळत होते. तोच लॉकडाऊन शिथील करण्यात आल्याने वाहतूकीसाठी हा मार्ग पुन्हा सुरू झाला आहे. या मार्गाने दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या वाढली आहे. या ठिकाणी पोलीस तैनात असूनही पोलीसांकडे दुर्लक्ष करत नियमांचे उल्लघंन केले जात आहे. यामुळे आयो जाओ घर तुम्हारा अशी अवस्था झाली आहे.
2. सेवन स्टॉर मॉल परिसरात पार्किंग झोन
लॉकडाऊन शिथील केल्याने खरेदीसाठी सातारकर नागरिक मोठया संख्येने दररोज घरबाहेर पडत आहेत. सकाळच्या वेळी ताजी भाजी खरेदीच्या नावाखाली विनाकारण फिरणाऱयांच्या संख्येतही वाढ झाली आहे. या वाहनधारकांना आवर घालण्यासाठी एसटी स्टॅड परिसरातील सेवन स्टॉर मॉल येथील चौक अद्याप बंद आहे. या वाहनधारकांना येथे दुचाकी उभ्या करून पुढे चालत जाण्यास परवानगी दिली जात आहे. यामुळे चौकात गाडया अस्थाव्यस्थ पद्धतीने लावण्यात येत आहेत. तसेच इतर वाहने या मार्गाने येत असल्याने सकाळ वेळी वाहतूक कोंडी होवून वाहने अडकून पडत आहेत.
3. दुचाकी, चारचाकी फुल्ल…
लॉकडाऊन शिथील केले तरी घराबाहेर पडताना दुचाकी वाहनांवरून एक जण प्रवास करू शकतो. तर चारचाकी वाहनातून डायव्हर आणि एक व्यक्ती असे फक्त दोघे प्रवास करू शकतात. असे असतानाही शहरातून एका दुचाकीवरून दोन व्यक्ती प्रवास करताना वारंवार आढळून येत आहेत. या वाहनधारकांना पोलीसांकडून सुचना करण्यात येत आहेत. तरीही काही वाहनधारक नियमांचे उल्लघंन करत असल्याने त्यांच्यावर पोलीसांकडून कारवाई करण्यात येत आहे.
4. किरणामाल, औषधे खरेदीला गर्दी…
लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या वेळा निश्चित केल्या होत्या. यामुळे लोक आठवडाभर पुरेल इतके सामान एकाच दिवशी खरेदी करत होते. आता दररोज खरेदीची मुभा मिळाल्याने खेरदीच्या नावाखाली नुसतीच दुकानात गर्दी करण्यात येत आहे. किरणामाल दुकानात रांगेत न उभे राहता सरळ आता प्रवेश करत आहेत. तर औषधांपेक्षा सौदर्यंप्रसाधने खरेदीवर भर दिला जात आहे.
5. महिला ही खरेदीसाठी घराबाहेर…
जीवनावश्यक वस्तूची विक्री सूरू असताना काही ठिकाणी महिला खरेदीसाठी गर्दी करताना दिसत आहे. कॅस्मेटिक साहित्य विक्रेत्यांनी इतर साहित्य विक्रीला सूरूवात केल्याने महिलांची खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. या विक्रेत्यांना परवानगी मिळालेली नाही. तरीही छुप्या पद्धतीने ही विक्री होत आहे. याकडे पोलीसांनी दुर्लक्ष केले आहे.
6. हॉटेल, राजवाडा चौपाटी बंदच…
गेल्या दोन दिवसापासून खरेदीच्या वेळा वाढवल्या आहेत. यांचा फायदा दुकानदारांनी घेतला असून अर्ध शटर सुरू ठेवुन विक्री सूरू आहे. मात्र हॉटेल व्यवसायिकांनी अद्याप हॉटेल बंद ठेवले आहेत. जो पर्यंत प्रशासनाकडून कोणताही आदेश मिळत नाही. तो पर्यत हॉटेल सुरू करणार नसल्याचे हॉटेल मालकांकडून सांगण्यात येत आहे.
7. बॅकेत तुफान गर्दी
महिन्यांची सुरूवातील पेशन, पगार जमा होत असून बॅकेत पैसे काढण्यासाठी गर्दी होत आहे. तरूणापेक्षा वयोवृद्धांची संख्या जास्त आहे. सोशल डिन्टंन्सचे सर्व नियम मोडले जात आहेत. वारंवार सुचना करूनही लोकांना मनमानी कारभार वाढत चालला आहे.