प्रतिनिधी/ पणजी
गोवा नागरी सेवेतील 15 वरिष्ठ अधिकाऱयांच्या बदल्यांचा आदेश सोमवारी जारी झाला असून या बदल्या जनहितार्थ करण्यात आल्याचे अवर सचिव नाथीन आरावजो यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.
या आदेशाप्रमाणे गोवा राज्य माहिती आयोगाचे अवर सचिव शशांक ठाकूर यांची बदली डी. आर. डी. ए. चे प्रकल्प अधिकारी म्हणून केली आहे. दक्षता खात्याच्या उपसंचालक माया पेडणेकर यांच्याकडे या खात्याच्या अतिरिक्त संचालक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
समाज कल्याण खात्याचे उपसंचालक ताह हरिक यांना दिव्यांग आयोगाचे सचिव म्हणून पाठवण्यात आले आहे. आय. टी. चे प्रशासकीय उपसंचालक कपिल फडते यांच्याकडे राज्य मानसिक स्वास्थ प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली आहे.
महसूल विभाग उत्तर गोवा उपजिल्हाधिकारी अजय गावडे यांच्याकडे क्रीडा संचालक म्हणून गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक म्हणून जबाबदारी दिली आहे. गृह खात्याचे अतिरिक्त सचिव श्रीनेत कोतवाले यांना दक्षिण गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून पाठवण्यात आले आहे.
महसूल खात्याचे संयुक्त सचिव परेश फळदेसाई दक्षिण गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी (2) पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. भूसर्वेक्षण व तपशील विभागाचे संचालक जॉन्सन फर्नांडिस यांना दक्षिण गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी (3) पदी बदली करण्यात आली आहे.
माहिती व प्रसिद्धी खात्याचे संयुक्त सचिव केदार नाईक यांच्याकडे उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी (2) हे पद देण्यात आले आहे. दक्षिण गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी (1) सुरेंद्र नाईक यांच्याकडे महसूल खात्याचे संयुक्त सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
उपजिल्हाधिकारी प्रसाद वळवईकर यांना गोवा राज्य मागास जाती जमाती व इतर मागास वर्ग राज्य आयोगाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पाठवण्यात आले आहे. खाण खात्याचे उपसंचालक मानुएल बार्रेटो यांना दक्षिण गोवा जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अवर सचिव विशाल कुडाळकर यांना सेटलमेन्ट ऍन्ड लेड रिकॉर्ड विभागाचे संचालक म्हणून पाठवण्यात आले आहे.
दक्षिण गोवा आर डी. ए. प्रकल्प संचालक प्रविण एम. एस. बरड यांची गोवा कोकणी अकादमीचे सचिव म्हणून जबाबदारी दिली आहे. तर कोलवाळ येथील तुरुंगाचे राज्य तुरुंग महानिरीक्षक व्हेनेसिओ फुर्तादो यांच्याकडे या पदाच्या ताब्यासह जी आय डी चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून अतिरिक्त ताबा दिला आहे.
उत्तर गोवा डी.आर.डी.ए. मिना नाईक गोलतेकर व गोवा मानसिक स्वास्थ प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी देविदास गावकर यांच्याकडे कुठलाच विभाग देण्यात न आल्याने त्यांनी तूर्त परसोनेल विभागात हजेरी लावावी, असा आदेश त्यांना देण्यात आला आहे.