पुलाची शिरोली / वार्ताहर
नागाव तालुका हातकणंगले येथील अज्ञात चोरट्यांनी साडेपाच लाख रुपये किंमतीची मारुती स्विफ्ट डिझायर ही कार चोरून नेली आहे. ही घटना नागाव येथील शिशीर बिडकर यांच्या महिंद्रा लॉजिस्टिक येते घडली आहे. याबाबतची फिर्याद अशपाक मुल्ला वय वर्ष ३२ रा. कबनूर यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे.
शिरोली पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अश्फाक मुल्ला यांनी मारुती स्विफ्ट डिजायर कार शिशीर बिडकर यांच्या महिंद्रा लॉजिस्टिक येथे पार्किंग केली होती. ही कार अज्ञात चोरट्यांनी दिनांक ४ जानेवारी ते ५ जानेवारी पहाटेपर्यंत ही कार चोरून नेली आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग कोल्हापूर यांचेकडून सुरू आहे.