नारायण विष्णू पाटील विजयी उमेदवाराचे नाव
प्रतिनिधी/ बेळगाव
ग्राम पंचायतीच्या निवडणूका या नेहमीच चुरशीने होतात. केवळ एक ते दोन मतांनी तर काही वेळा मोठय़ा मतफरकाने उमेदवार निवडून येतात. तर काही वेळा दोघांचीही समान मते होतात. अशा घटना घडल्या आहेत. यावषी नुकत्याच झालेल्या मतमोजणीमध्ये नंदिहळ्ळी ग्राम पंचायतीच्या अखत्यारित येणाऱया नागेनहट्टी येथील वॉर्ड क्रमांक 4 मधील उमेदवार नारायण विष्णू पाटील हे एका मताने विजयी झाले आहेत. यामुळे हा एक चर्चेचा विषय बनला आहे.
वॉर्ड क्रमांक 4 मध्ये एकूण 520 मतदान आहे. अत्यंत चुरशीने 475 मतदान झाले. या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात व गोव्यात असलेल्या मतदारांनाही उमेदवारांनी बोलावून घेतले होते. ही अत्यंत चुरशीने निवडणूक पार पडली होती. त्यामध्ये नारायण विष्णू पाटील यांनी 237 मते घेतली तर कृष्णा रामा पाटील यांनी 236 मते घेतली. केवळ एक मताच्या फरकाने नारायण पाटील हे विजयी झाले.
यावषी ग्राम पंचायत निवडणुकीलाही मोठय़ा प्रमाणात मतदान झाले. काही ठिकाणी 80 ते 90 टक्क्मयांपर्यंत मतदान गेले होते. स्थानिक पातळीवर एक प्रति÷sची ही निवडणूक मानल्यामुळे मतदानाची आकडेवारी वाढली होती. नंदिहळ्ळी ग्राम पंचायतमध्ये दरवषीच चुरस असते. यावषीही मोठय़ा चुरशीने मतदान झ्पाले आणि केवळ एका मताने उमेदवार विजयी झाला आहे. यामुळे तालुक्मयात हा चर्चेचा विषय झाला आहे.