कला अकादमी 46 व्या कोंकणी नाटय़स्पर्धेचा निकाल जाहीर
प्रतिनिधी /पणजी
कला अकादमीने आयोजित केलेल्या 46 व्या कोंकणी नाटय़स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. नागेश महालक्ष्मी प्रासादिक नाटय़समाज बांदोडा यांनी सादर केलेल्या ‘मुक्ती’ या नाटकास 1,00,000/- रुपयांचे प्रथम पारितोषिक तर युवा एकवट भोम फ्ढाsंडा यांच्या ‘कण्वपुरातलो महापूर’ नाटकास 75,000/- रुपयांचे द्वितीय पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. तसेच रसरंग उगवे यांच्या ‘एवम् इन्द्रजित’ या नाटकाची 50,000/- च्या तृतीय पारितोषिकासाठी निवड करण्यात आली आहे. ओल्ड गोवा यांच्या ‘धुकोर’ व स्वरसाधना सांस्कृतिक संस्था मांद्रे यांच्या ‘उगडयाक मेळ्ळो नागडो…’ या नाटकांनी 25,000/- रुपयांची उत्तेजनार्थ पारितोषिके पटकावली.
उत्कृष्ट दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक सुशांत नाईक यांना ‘मुक्ती’ या नाटकासाठी प्राप्त झाले. वैभव कवळेकर यांनी ‘कण्वपुरातलो महापूर’ नाटकासाठी द्वितीय पारितोषिक मिळविले. तृतीय पारितोषिक ‘एवम् इन्द्रजित’ नाटकासाठी निलेश महाले यांना देण्यात आले.
पुरूष गटात वैयक्तिक अभिनयासाठी वैभव कवळेकर यांना ‘कण्वपुरातलो महापूर’ नाटकातील (अभिजीत) या भूमिकेसाठी प्रथम पारितोषिक देण्यात आले. †िद्वतीय पारितोषिक अंकुश पेडणेकर यांना ‘उगडय़ाक मेळ्ळो नागडो…’ नाटकातील (स्वीपर 1) भूमिकेसाठी प्राप्त झाले. अभिनयासाठीची प्रशस्तीपत्रे नारायण अशा आनंद (उगडो/नागडो) ‘उगडय़ाक मेळ्ळो नागडो…’, मयुर मयेकर (पावलू) ‘धुकोर’, वैभव नाईक (अमल) ‘एवम् इन्द्रजित’, रुणाल कोलकणकर (इंद्रजित) ‘एवम् इन्दजित’, प्रशांत सतरकर (सुखानंद) ‘भाग्यचक्र’ व गौतम गावडे (प्रितम) ‘इन सर्च ऑफ्ढ’ यांना प्राप्त झाली.
स्त्री गटात वैयक्तिक अभिनयासाठी डॉ. संस्कृती रायकर यांना ‘मुक्ती’ नाटकातील (आशा) भूमिकेसाठी प्रथम पारितोषिक जाहीर करण्यात आले. शेफ्ढाली नाईक यांना ‘कण्वपुरातलो महापूर’ नाटकातील (समा) भूमिकेसाठी †िद्वतीय पारितोषिक मिळाले. अभिनयासाठी प्रशस्तीपत्रके दीपलक्ष्मी मोघे (फ्ढ्रास्कीना) ‘धुकोर’, ममता †िशरोडकर (लक्ष्मी गौडा) ‘आवरण’, साध्वी मावजेकर (निशा) ‘मुक्ती’, प्रज्ञा कामत (विभा) ‘गुढ मनाच्या गर्भतळात’, ऐश्वर्या संगीता भरत नायर (उर्वशी) ‘इन सर्च ऑफ्ढ’ व शर्मिला नाईक (चंपा) ‘सखाराम बाईंडर’ यांना प्राप्त झाली.
उत्कृष्ट नेपथ्यासाठीचे पारितोषिक सौमित्र बखले यांनी ‘एवम् इन्द्रजित’ नाटकासाठी प्राप्त केले. संदीप कळंगुटकर यांना ‘धुकोर’ नाटकासाठी प्रशस्तीपत्रक देण्यात आले. ‘कण्वपुरातलो महापूर’ या नाटकाच्या वेशभूषेसाठी अनिकेत नाईक यांना पारितोषिक मिळविले. तर प्रशस्तीपत्रक ‘एवम् इन्द्रजित’ नाटकासाठी शनया महाले यांना देण्यात आले. प्रकाशयोजनेसाठीचे बक्षीस सुशांत नायक यांना ‘मुक्ती’ नाटकासाठी प्राप्त झाले असून प्रशस्तीपत्रक निलेश महाले यांना ‘एवम् इन्द्रजित’ नाटकासाठी देण्यात आले. रंगभूषेचे पारितोषिक †िहमालय गावडे यांनी ‘आवरण’ नाटकासाठी प्राप्त केले. अमिता नाईक यांना ‘एवम् इन्द्रजित’ या नाटकासाठी प्रशस्तीपत्रक देण्यात आले. उत्कृष्ट पार्श्वसंगीतासाठीचे पारितोषिक तानाजी गावडे यांनी ‘मुक्ती’ या नाटकासाठी संपादन केले. तर सौरभ कारखनीस यांना ‘एवम् इन्दजित’ नाटकासाठी प्रशस्तीपत्रक देण्यात आले.
परीक्षकांच्या शिफ्ढारशीनुसार नाटय़लेखनासाठी साईराज नाईक (रक्तखेळ), गौतम गावडे (इन सर्च ऑफ्ढ) व उल्हास नायक (रूख चवरताना) यांना प्रशस्तीपत्रक देण्यात आली. खास स्पर्धेसाठी अनुवादित/रुपांतरीत/आधारित नाटय़संहिता लेखनाचे पारितोषिक वसंत सावंत यांच्या ‘धुकोर’ या नाटय़संहितेस देण्यात आले.
या स्पर्धेत एकूण 24 प्रवेशिका आल्या होत्या त्यातून 15 नाटके सादर झाली. स्पर्धेचे परीक्षण डॉ. प्रसाद गुरव, अजित कामत व प्रा. दीपक आमोणकर यांनी केले. पारितोषिकप्राप्त कलाकारांचे कला अकादमीच्यावतीने अभिनंदन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाची तारीख मागाहून जाहीर करण्यात येईल याची नाटय़प्रेमी, रसिकांनी व स्पर्धकांनी नोंद घ्यावी, असे कला अकादमीने कळविले आहे.