सात ठिकाणी श्रीमूर्ती विसर्जनाची व्यवस्था
प्रतिनिधी /बेळगाव
गणेशमूर्ती विसर्जनाची सात ठिकाणी व्यवस्था करण्यात आली असून, यंदा नाझर कॅम्प येथील विसर्जन तलावात श्रीमूर्ती विसर्जनास बंदी आहे. विसर्जन तलावावर मनपा अधिकारी व कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे.
कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे गणेशोत्सवावर विविध बंधने घालण्यात आली आहेत. यापूर्वी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना मंदिरामध्ये करण्यात यावी व लाऊडस्पीकर लावू नये, अशा विविध नियमावली जारी करण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे आता विसर्जनासाठीही विविध बंधने घालून नियमावली तयार करण्यात आली आहे. विसर्जन मिरवणूक काढण्यास बंदी असून, केवळ मोजक्मयाच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विसर्जन करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. शहर आणि उपनगरात सात ठिकाणी विसर्जन तलाव असून त्याठिकाणी विद्युत सुविधा, मोठय़ा तलावाच्या ठिकाणी पेनची व्यवस्था केली आहे. आवश्यक ठिकाणी मनपा अधिकारी व कर्मचाऱयांची नियुक्ती केली आहे.
वडगाव नाझर कॅम्प येथे विसर्जन कुंड तयार करण्यात आला आहे. मात्र तलावाशेजारी असलेली विहीर मागीलवषी कोसळली आहे. परिणामी या ठिकाणी असलेली माती ढासळल्याने विसर्जन तलावाला धोका निर्माण झाला आहे. तसेच विसर्जनासाठी पाणी भरल्यानंतर तलाव कोसळण्याचा धोका आहे. हा धोका लक्षात घेऊन सदर ठिकाणी विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे घरगुती गणेश विसर्जनासाठी फिरत्या वाहनाची सुविधा केली आहे.
याठिकाणी श्री विसर्जनाची व्यवस्था
कपिलेश्वर तलाव, रामेश्वरतीर्थ (जक्कीनहोंड), अनगोळ काळा तलाव, मजगाव ब्रह्मनगर तलाव, जुने बेळगाव कलमेश्वर तलाव, किल्ला तलाव, कणबर्गी तलाव.