आज खुटवळ येथे सम्राट क्लब पेडणे टाऊनतर्फे कार्यक्रम
प्रतिनिधी /पेडणे
नटवर्य मास्टर दत्ताराम वळवईकर स्मृती नाटय़महोत्सवमाह निमित्त प्रसिध्द ज्ये÷ नाटय़ दिग्दर्शक व नाटय़कर्मी रामदास कृष्णा परब यांचा कार्यसन्मान 3 मार्च रोजी खुटवळ येथे सम्राट क्लब पेडणे टाऊन तर्फे होणार आहे.
सम्राट क्लब इंटरनॅशनल राज्य 1 च्या नटवर्य मास्टर दत्ताराम वळवईकर स्मृति नाटय़ महोत्सव दरवषी सम्राट क्लबा मार्फत साजरा केला जातो.
यंदाचा महोत्सव 1 मार्च ते 31 मार्च असा महीनाभर असुन या महोत्सवाचा भाग म्हणुन रंगदेवतेची अविरत निस्वार्थी सेवा करीत असलेल्या पण प्रसिध्दीपासुन दुर असलेल्या कलाकारांना हेरून त्यांचा सत्कार करून समाजाला जाणीव करून देण्यासाठी त्यांच्या कार्याची पावती म्हणुन कार्यसन्माना सारखे कार्यक्रम साजरे करून विधिध कलाकाराना प्रोत्साहन देण्याचे काम सम्राट क्लब पेडणे टाऊन अविरत करीत आहेत.
यावेळी पेडणे तालुक्मयातील भुमिपुत्र प्रसिध्द जे÷ नाटय़कर्मी आणि दिग्दर्शक विर्नोडा गावचे रहीवाशी हे गेली 35 वर्षे गोव्यात तसेच महाराष्ट्रातील भागात जाऊन नाटय़दिग्दर्शन करीत आहेत.त्यानी कीत्येक कलाकार तयार केले आहेत.
श्री देवी ब्राम्हणी-देवस्थान खुटवळ पेडणे येथे देवीच्या वर्धापन दिनादिवशी नटवर्य मास्टर दत्ताराम वळवईकर यानी आपल्या अभिनय कौशल्याने अजरामर केलेले संगीत शहा-शिवाजी या नाटकाला दिग्दर्शन रामदास परब यानी केलेले आहे.
रामदास परब याना वेगवेगळे अगणित असे पुरस्कार लाभलेले आहेत.गोवा कला-संस्कृती संचालनालयाचा राज्यपुरस्कार देऊन सुध्दा गौरव करण्यात आलेला आहे.
खुटवळ गावच्या ग्रामपंचायतीचे पंच श्री विशाल नाईक आणि सौ. दिव्या नाईक यांच्या उपस्थितीत सम्राट क्लब पेडणे टाऊनचे अध्यक्ष सम्राट व्यंकटेश विश्वनाथ नाईक यांच्या हस्ते सत्कारमुर्ती श्री रामदास कृष्णा परब यांच्या कार्याचा कार्यसन्मान आज गुरूवार दिनांक 3 मार्च रोजी ठीक 9 विजता होणार आहे. रामदास परब यांचे शिष्य कलाकार,हीतचिंतक आणि सम्राट क्लब पेडणे टाऊनचे सम्राट सदस्य यानी कार्यक्रम वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन सम्राट क्लब पेडणे टाऊन च्या सचिव सम्राट सौ.प्रिया टांकसाळी यानी कळविले आहे.”