प्रतिनिधी/ बेळगाव
नाटय़भूषण एणगी बाळप्पा या महान कलाकाराच्या नावे स्मारक ट्रस्टची स्थापना करावी, यासाठी बेळगावातील साहित्यिकांनी शनिवारी राज्य सरकारकडे मागणी केली आहे. यासंबंधी जिल्हाधिकाऱयांमार्फत सरकारला निवेदन देण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची भेट घेऊन ज्ये÷ साहित्यिक प्रा. बी. एस. गवीमठ, डॉ. सरजू काटकर, डॉ. बसवराज जगजंपी, प्रा. ए. जी. अष्टगी, डॉ. रामकृष्ण मराठे, सुभाष एणगी आदींनी सरकारला निवेदन दिले.
टिळकवाडी येथील कला मंदिराची नव्याने उभारणी केली जात आहे. कला मंदिरला एणगी बाळप्पा यांचे नाव द्यावे. याबरोबरच बेळगाव येथील एका प्रमुख मार्गाला त्यांचे नाव द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. एणगी बाळप्पा स्मारक ट्रस्टची स्थापना करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला नाही. त्यामुळे आमदार, खासदार निधी व साखर कारखान्यांकडून निधी उभारून नाटय़कला व संस्कृतीचे जतन करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे..