प्रतिनिधी/ पणजी
गोमंतकीय प्रसिद्ध नाटय़ दिग्दर्शक शिवनाथ नाईक यांची विशेष मुलाखत गोवा दूरदर्शनवर आज दि. 6 रोजी सायं 5.05 वाजता प्रसारित होणार आहे.
राजेंद्र फडते यांची प्रस्स्तुती असलेल्या गोवा दूरदर्शनच्या कलाविष्कार कार्यक्रमात नाटय़कर्मी शिवनाथ नाईक यांच्याशी गोमंतकीय गायक कलाकार विठ्ठल गावस संवाद साधणार आहेत.
विर्डी सांखळी येथील रहिवासी असलेले श्री. नाईक हे कला आणि संस्कृती खात्यातर्फे नाटय़शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. अनेक नाटकात त्यांनी अभिनय, पार्श्वसंगीत आणि दिग्दर्शन केले आहे. केरी सत्तरी येथील ’स्वर सत्तरी’ची निर्मिती असलेल्या संगीत नाटकांचे दिग्दर्शन करुन राजीव कला मंदिराच्या नाटय़ स्पर्धेत सतत चौथ्यांदा पहिले बक्षिस मिळवले आहे.