पुरामुळे लाखेंची नुकसानी, गोवा धनगर समाज सेवा संघ सत्तरीतर्फे आर्थिक मदत
प्रतिनिधी /वाळपई
सत्तरी तालुक्मयात नुकत्याच आलेल्या पुरामुळे नाणूस येथील गोशाळेची प्रचंड प्रमाणात नुकसानी झाली. या गोशाळेमध्ये जवळपास 100 पेक्षा जास्त गुरे दगावली. त्याचप्रमाणे शाळेमधील अन्य स्वरुपाची जवळपास पंधरा लाखांचे नुकसान झाली. त्यामुळे सध्यातरी व गोभक्ताकडून या शाळेला मदतीचा ओघ सुरूच आहे .आज गोवा धनगर समाज सेवा संघ सत्तरी शाखेतर्फे व गोशाळेला आर्थिक मदत सुपुर्द करण्यात आली.
यावेळी धनगर समाज सेवा संघ सत्तरी विभागाचे अध्यक्ष बी.डे मोटे, सचिव पवन वरक, खजिनदार बाबू पावणे,बिरो काळे, गंगाराम पावणे व इतरांनी प्रत्यक्षपणे हजेरी लावून या संदर्भाची मदत व गोशाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हनुमंत परब यांच्याकडे सुपूर्द केली.
यावेळी बोलताना अध्यक्ष बिडी मोटे यांनी सांगितले की गोशाळेचे कार्य महान आहे. आपल्या समाजामध्ये गोमातेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. अनेक प्रकारच्या समस्या व संघर्ष या महापुरामुळे गोशाळेचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झालेली आहे. यामुळे प्रत्येकाने आपल्यापरीने या शाळेला मदत करणे अत्यंत गरजेचे आहे. धनगर समाज सेवा संघाने आतापर्यंत वेगवेगळय़ा स्तरावर सामाजिक कार्याला चालना दिलेली आहे. याच अनुषंगाने या गोशाळेला मदत करण्याचा निर्णय संघाच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आल्यानंतर यासंदर्भाची मदत व गोशाळेला सुपूर्द केल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
या गोशाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हनुमंत परब यांनी यावेळी धनगर समाज सेवा संघाच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. गोशाळेचे कार्य चांगल्या पद्धतीने सुरू आहे. यावेळी धनगर समाज सेवा संघ यानी दिलेल्या मदतीप्रित्यर्थ व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हनुमंत परब यांनी समाधान व्यक्त केले. गोव्याच्या वेगवेगळय़ा भागातून मोठय़ा प्रमाणात व गोभक्त या शाळेच्या मदतीसाठी लावलेले आहेत. आतापर्यंत वेगवेगळय़ा स्तरावर चांगल्या प्रकारे मदत देण्यात आलेली आहे. यामुळे जोपर्यंत गोभक्त सक्रीय आहेत तोपर्यंत या गोशाळेला कोणत्या प्रकारची भीती नाही असे विधान करताना हनुमंत परब यांनी समाजातील वेगवेगळय़ा सामाजिक संस्था आध्यात्मकि संस्था धार्मिक संस्था यांनी गोशाळेच्या आर्थिक पाठबळासाठी सहकार्य द्यावे असे आवाहन केले आहे.