शांती, सुख, समृद्धी लाभो ः राज्यपाल
गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी नाताळच्या निमित्ताने गोमंतकीय जनतेला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
नाताळच्या शुभप्रसंगी आपण ईश्वराचा पुत्र असलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताला आठवतो. त्याने आपल्याला शांती, सहनशीलता, क्षमा, प्रेम व बंधुत्वाची शिकवण दिली आहे, असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. या आनंदाच्या प्रसंगी, येशू ख्रिस्त आपले बहुमोल आशीर्वाद गोमंतकीय जनतेला देवो आणि हा सण आपल्या सर्वांना शांती, सुख व समृद्धी घेऊन येवो, अशाही सदिच्छा त्यांनी दिल्या आहेत.
येशू ख्रिस्ताच्या संदेशाचे अनुकरण करा ः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नाताळच्या शुभप्रसंगी गोमंतकीय जनतेला, विशेषतः ख्रिस्ती बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
येशू ख्रिस्ताच्या जन्मदिनी नाताळ साजरा केला जातो. नाताळ हा बंधुत्वाचा व आनंदाचा सण असून, तो आपल्याला त्याग, प्रेम, ऐक्मय, दया व शांती यांचा संदेश देतो. हा पवित्र सण साजरा करताना आपण सर्वांना मदत करून येशू ख्रिस्ताच्या
प्रेम व क्षमा यांच्या शाश्वत संदेशाचे अनुकरण केले पाहिजे, असा संदेश त्यांनी राज्याच्या जनतेला दिला आहे.