70 वर्षांची मेहनत अखेर फळली
माणसाने कुठल्याही स्थितीत हार मानू नये आणि स्वतःचे प्रयत्न सुरू ठेवावेत असे बोलले जाते. अमेरिकेतील एक वृद्ध रेने नेइरा हे मागील 70 वर्षांपासून पदवी मिळविण्यासाठी प्रयत्न करत होते. अखेरीस त्यांची मेहनत फळली असून वयाच्या 88 व्या वर्षी ते पदवीधर झाले आहेत. मजेशीर बाब म्हणजे त्यांच्यासाब्sात तयंची 23 वर्षीय नात देखील ग्रॅज्युएट झाली आहे.
नात-आजोबांच्या या जोडीने कॉलेजमधून डिग्री मिळविल्यावर त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. रेने हे अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील एंटोनियो येथील रहिवासी आहेत. 1950 च्या दशकात त्यांनी प्रथम कॉलेजमध्य प्रवेश घेतला होता. परंतु त्यांनी कुटुंबाच्या देखभालीसाठी कॉलेजमध्ये जाणे बंद केले होते. स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्याचे स्वप्न मात्र त्यांनी उराशी बाळगले होते.
विद्यापीटात रेने अत्यंत लोकप्रिय
नात मेलानिए सालजारने शालेय शिक्षण पूर्ण केले आणि कॉलेज डिग्रीसाठी प्रयत्न सुरू केल्यावर रेने हे देखील नातीसोबत कॉलेजमध्ये जाण्यास प्रेरित झाली. त्यांनी 4 वर्षांसाठी युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासमध्ये प्रवेश घेतला. युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये ते अत्यंत लोकप्रिय ठरले. तसेच अन्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा आणि उत्साहाचे स्रोत झाले. मेलानिएने कम्युनिकेशनच्या क्षेत्रात पदवी प्राप्त केली. तर तिचे आजोबा रेने यांनी अर्थशास्त्रात पदवी मिळविली आहे. दोघेही स्टेजवर स्वतःची पदवी स्वीकारण्यासाठी पोहोचले तेव्हा मेलानिए भावुक झाली.
कुटुंबाची जबाबदारी
1950 च्या दशकात माझे आजोबा हे माझ्या आजीच्या प्रेमात पडले आणि त्यांनी विवाह केला. त्यानंतर कुटुंब वाढत गेल्याने रेने यांना शिक्षण सुरू ठेवता आले नाही. इतक्या वर्षांमध्ये रेने यांना पतीची जबाबदारी पार पाडताना शिक्षणावर लक्ष केंद्रीत करणे अवघड होते. त्यांना 5 मुलं होती आणि ते स्थानिक बँकेत काम करत होते असे नात मेलानिएने सांगितले.