प्रतिनिधी /बेळगाव
मराठा मंडळच्या नाथाजीराव हलगेकर इन्स्टिटय़ूट ऑफ डेंटल सायन्सेस ऍण्ड रिसर्च सेंटरच्यावतीने कॉलेजमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. नुकत्याच जाहीर झालेल्या बेंगळूर येथील राजीव गांधी युनिव्हर्सिटी हेल्थ सायन्सेसच्या निकालामध्ये 15 पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी फर्स्ट रँक घेत घवघवीत यश मिळविले. या विद्यार्थ्यांचा संस्थेच्यावतीने सन्मान करण्यात आला.
मराठा मंडळच्या अध्यक्षा राजश्री नागराजू, कार्यक्रमाची अतिथी ओऊळकर, व्यवस्थापन कमिटीचे सदस्य व संचालक सैनुचे, झंगरूचे, नागराज यादव, घसारी यासह इतर उपस्थित होते. प्राचार्य डॉ. रमाकांत नायक यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ओऊळकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत यापुढेही कॉलेजने अशीच प्रगती करावी, अशा शुभेच्छा दिल्या. संचालक नागराजू यादव यांनी कौशल्य विकास करण्याचा सल्ला दिला.
अध्यक्षा राजश्री नागराजू यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत प्राध्यापकांचेही आभार मानले. मराठा मंडळ संस्थेच्या कार्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे उपाध्यक्ष दिनकर ओऊळकर यांचा अध्यक्षा राजश्री नागराजू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी रुग्णवाहिकेचे चालक अशोक कुचनूरे यांचाही सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला डॉ. आरती नायक, डॉ. आर. बी. हळ्ळीकेरीमठ, डॉ. राजेश पटनाईक, डॉ. काजोल चक्रवर्ती यासह इतर उपस्थित होते.