वारणानगर / प्रतिनिधी
दंत महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अनुराज राजाभाऊ जुगदर वय .२५ रा. नांदुरघाट; ता. केज जि.बीड या विद्यार्थ्यांने परिक्षेत सलग दोन वेळा नापास झाल्याच्या नैराश्यातून वाघबीळ ता. पन्हाळा येथील एका लॉजिंग मधील पंख्याला दोरीने गळफास लावुन आत्महत्या केली.
रौनक अनिल वरयाणी रा. गणपतीनगर, जि. जळगाव यानी कोडोली पोलीस ठाणे येथे याबाबत वर्दी दिल्यावर अकस्मात मयत म्हणून पोलीसानी सदर घटनेची नोंद झाली आहे.
विद्यार्थी अनुराज राजाभाउ जुगदर याने आपण दंत वैधकीय परिक्षेत दोन वेळा नापास झालोय या नैराश्या पोटी आत्महत्या करीत असल्या बाबत घटनास्थळी पुरावा मिळाल्याचे पोलीसानी सांगीतले शनिवार दि. २ रोजी रात्री ११.३० वा.पूर्वी त्याने आत्महत्या केली असावी असा पोलीसांनी अंदाज बर्तवला आसून तपास सपोनि शितलकुमार डोईजड, सहा . फौजदार कदम करीत आहेत.