पंजाबमधील अमृतसर शहरातील एका पॅडल रिक्षा चालकाची ही प्रेरणादायी कहाणी आहे. त्याचे नाव राजवीर सिंग असे आहे. शिख धर्माचे संस्थापक गुरुनानक देव यांचा नाम जपो… किरत करो हा सिद्धांत त्यांनी आचरणात आणला आहे. 22 वर्षापूर्वी त्यांनी मानवत्तेच्या सेवेचा संकल्प सोडला. तसे त्यांचे उत्पन्न बेताचेच आहे. तरीही ते आपल्या उत्पन्नातून प्रति दिन एक दशांश रक्कम बाजूला काढतात आणि त्यातून गरजवंत लोकांची साहाय्यता करतात. आपल्या रिक्षातून ते गरिबांसाठी लोकांना विनामूल्य धान्य वाहतूक करतात. तसेच औषधांचीही ने-आण करतात. त्यांना लिहिण्याची आवड असून स्वतःच्या 14 लघुकथांचे एक पुस्तकही त्यांनी प्रसिद्ध केले आहे. त्यांच्या पुस्तकाचे नाव ‘रिक्षे ते चलदी जिंदगी’ असे आहे. दिवसभर पॅडल रिक्षा चालविणे आणि रात्री लेखन करणे असा त्यांचा कार्यक्रम आहे. आपल्या उत्पन्नाच्या एक दशांश भागातून त्यांनी एका दाम्पत्याचे उत्तरदायित्त्व स्वीकारले आहे. या दाम्पत्याला ते प्रत्येक महिन्याला रेशन पुरवितात. तसेच अनेक गरिबांच्या नेत्रशस्त्रक्रियांना त्यांनी साहाय्य केले आहे. त्यांना त्यांच्या या कार्याबद्दल समाजसेवा पुरस्कारही मिळाला आहे.
Previous Articleमोटोरोलाचा येणार टीव्ही
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.