वडूज / प्रतिनिधी :
नायकाचीवाडी (ता. खटाव) येथील गव्हळ नावाच्या शिवारात मृत कोल्हा आढळून आला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, येथील माजी ग्रामपंचायत सदस्य धनाजी श्रीपती जाधव हे वडूज-रहिमतपूर रस्त्यानजीक असणाऱ्या गव्हळ नावाच्या शिवारात ज्वारी पिक पाहण्यासाठी बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास गेले होते. त्यांना ज्वारीच्या पिकात एक मृत अवस्थेतील कोल्हा आढळून आला. याप्रकरणी त्यांनी वनविभागाशी संपर्क साधल्यानंतर वनसंरक्षक आनंदराव चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत कोल्ह्यास वडूज येथील तालुका लघुसर्वचिकित्सालयात आणले. या ठिकाणी डॉ. नितीन खाडे यांनी मृत कोल्ह्याचे शवविच्छेदन केले.