अबुजा
आफ्रिकेतील नायजेरियात सध्या इंधन संकट गडद झाले असून यासंदर्भात जनतेने सरकारकडे आक्रोश व्यक्त केला आहे. विविध शहरांत दुचाकी, चारचाकी वाहनांच्या इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपांवर रांगा लागल्या आहेत.
विविध शहरात इंधनटंचाई जाणवत असून शहरवासीयांनी सरकारकडे याबाबत आवाज उठवला आहे. तेल नियामकाला नायजेरियात इंधनाचा सुरळीत पुरवठा करता न आल्याने वाहनधारक जनतेचे हाल होत आहेत. देशभरातील इंधन विपेत्यांपर्यंत इंधनाचा पुरवठा विविध पंपांना होऊ शकलेला नाही. शहरभरातील इंधन पंपांवर दुचाकीचालक व कारचालकांनी रांगा लावल्या आहेत. काहींनी तर रात्र पेट्रोल पंपावर जागून काढली आहे. देशाची राजधानी अबुजातही इंधनाची टंचाई जाणवत असून वाहनधारकांचे हाल होत आहेत. मालवाहतूकधारकांनी सरकारच्या धोरणाविरुद्ध आवाज उठवत बंद पाळल्याने इंधनाचा पुरवठा होऊ शकला नाही. इंधननिर्मिती करणारा देश असला तरी अजूनही स्वयंपूर्ण नसल्याने इंधनासाठी आयातीवर अवलंबून रहावे लागत आहे. या देशाने 2021 मध्ये उत्पादनापैकी 7 टक्के इंधनाची निर्यात केली होता