ऑनलाईन टीम / नायजर :
नायजेरियाच्या दक्षिण-पूर्व भागातील ओवेरी शहरात सोमवारी पोलीस आणि लष्कराच्या इमारतीवर अज्ञातांनी 2 तास गोळीबार केला. या गोळीबारानंतर तुरुंगातील दोन हजार कैद्यांनी एकाच वेळी पलायन केले. या हल्ल्यात सरकारी इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने घेतली नसून, हल्ल्यामागे फुटीरतावादी गट असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
हल्ल्यानंतर ओवेरीलगतच्या दोन शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नायजेरियाचे राष्ट्रपती मोहम्मद बुहारी यांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे.