म्हापसा / प्रतिनिधी
दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपुत यांच्या आत्महत्या प्रकरणाशी गोव्यातील ड्रग्ज डिलींग करणार्यांचे थेट संबंध होते हे आता स्पष्ट झालेले आहे, त्यामुळे नारकोटीक्स ब्य?रोकडून कळंगुटातील विद्यमान राजकारणी तसेच त्यांच्या गोत्यातील विशेष लोकांची कसून चौकशी होणे आवश्यक असल्याची जोरदार मागणी कळंगुटचे माजी सरपंच तथा हेवीवेट राजकारणी जोजेफ सिक्वेरा यांनी केली आहे. दरम्यान, दोन दिवसांपुर्वीच एनसीबीकडून ताब्यात घेण्यात आलेल्या एफ. अहमद तसेच टोनी फर्ना?डिस यांच्याशी स्थानिक ?ळंगुट पंचायतीच्या उप-सरपंच पुजा मठकर तसेच पंच सदस्य शेरॉल लोबो यांचे व्यवसायिक संबंध असल्याचा आरोप सिक्वेरा यांनी केला आहे. दरम्यान, योग्यवेळी स्थानिक आमदार तथा मंत्री असलेल्या मायकल लोबो यांचा ड्रग्ज व्यवहार प्रकरणात कितपत संबंध आहे आणी होता याचा भांडाफोड करण्यात येणार असल्याचे जोजेफ सिक्वेरा यांनी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नांवर उत्तर देतांना सांगितले. कळंगुटात ड्रग्ज, आणी वेश्याव्यवसायास गेल्या तीन वर्षापासून मोठय़ा प्रमाणात फोफावत चालल्याचे दिसून येत आहे तसेच स्थानिक पोलिस निरीक्षक नोलास्को रापोझ याबाबतीत स्थानिक राजकारण्यांशी हात मिळवणी करून असल्याचे सिक्वेरा यांनी पुढे सांगितले तथापि या भ्रष्ट अधिकार्याच्या विरोधात आपण स्वता पोलिस महानिरीक्षक तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कार्यालयात तक्रार दाखल केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कळंगुट आणी परिसरात फोफावलेल्या ड्रग्ज डिलींग तसेच अनैतिक व्यवहारांना छुपा पाठींबा देणार्या स्थानिक राजकारण्यांचे सुशांत सिंग आत्महत्येनंतर पितळ उघडे पडणार असून त्यासाठी एनसीबीच्या पथकाकडून कळंगुटातील वादग्रस्त राजकारण्यांची कसून चौकशी होणे आवश्यक असल्याचे जोजेफ सिक्वेरा यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, सध्याच्या स्थितीत कळंगुट तसेच कांदोळीतील समुद्र किनारे ड्रगज व्यवसायाचे अड्डे बनले असून हणजुण वागातोरपर्यत खुलेआम रेव्ह पार्टय़ाचे आयोजन होत असते मात्र याबाबतीत वारंवार तक्रारी सादर करून सुद्धा राजकारण्यांच्या इशार्यानुसार वागणारे पोलिस अधिकारी अशा लोकांवर कारवाई करण्याचे हेतुपुरस्सर टाळतांना असेही त्यांनी सांगितले. बागा येथील टिटोस लेन तसेच आसपासच्या परिसरात संध्याकाळ होताच नायजेरियन लोकांचा जमाव एकत्रित होत असतो यावेळी त्याःच्याकडून मोठय़ा प्रमाणात अमली पदार्थाची देवाण घेवाण होत असते, हे सर्व नायजेरियन बार्देशातील पर्रा गावात वास्तव्य करून राहातात ,अशा लोकांचा गॉडफादर कोण हे लवकरच उघड होणार असल्याचा विश्वास जोजेफ सिक्वेरा यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, ड्रग्ज डिलर एफ. अहमद तसेच टोनी फर्ना?डिस यांच्या पाठोपाठ अनेक महाभाग कळंगुटात आश्रय घेऊन बसलेले आहेत एनसीबी तसेच क्राईम ब्रांचकडून अशा लोकांचा पर्दाफाश होणे आवश्यक असल्याचे जोजेफ सिक्वेरा यांनी शेवटी सांगितले.