वार्ताहर/ जाकादेवी
रत्नागिरी तालुक्यातील नारशिंगे गावची तेजस्वी रवोद्र आग्रे या खेळाडूची 69 व्या वरिष्ठ महिला गट राज्य अजिंक्यपद कबड्डी निवड चाचणीसाठी निवड झाली. आहे. रत्नागिरी जिह्याच्या संघात तिची निवड झाल्याने तिचे क्रीडा क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
तेजस्वीला तिचे वडील रवींद्र आग्रे, आई मीनाक्षी आग्रे, भाऊ शेखर आग्रे, शरद आग्रे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच तिची बहीण रश्मी आग्रे हिने तेजस्वीसोबत श्री सोमेश्वर प्रतिष्ठान, विल्ये संघाकडून खेळताना विविध स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन सरावासाठी मदत केली. तेजस्वीला क्रीडाप्रेमी आशिष सावंत व संतोष सनगरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. 28 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत काल्हेर, भिवंडी, जि. ठाणे येथे होणाऱया राज्य निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी डेरवण येथील सराव शिबिरात ती सहभागी झाली आहे. रत्नागिरी जिल्हा संघात निवड झाल्याबद्दल जाकादेवी पंचक्रोशी व नारशिंगे
ग्रामस्थांकडून तिचे कौतुक होत आहे.