ऑनलाईन टीम / श्रीनगर :
काश्मीरच्या बारामुल्लामध्ये सुरक्षा दलांनी नार्को टेरर मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. यावेळी दहशतवाद्यांच्या 12 मदतनीसांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून हेरॉइनची 11 पाकिटे, 4 पिस्तूल, काही मॅगझीन, 20 काडतुसे आणि एक लाख रुपयांचा धनादेश जप्त करण्यात आला आहे. हेरॉइनची किंमत 21.5 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येते.
बारामुल्ला परिसरात दहशतवाद्यांचे मदतनीस सक्रिय झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने कारवाई करत दहशतवाद्यांच्या नार्को टेरर मॉड्यूलचा पर्दाफाश केला. यावेळी दहशतवाद्यांच्या 12 मदतनीसांकडून हेरॉइनची 11 पाकिटे, शस्त्रास्त्रे, दारूगोळा, एक ट्रक, एक कार आणि स्कूटी जप्त करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या मदतनीसांची पोलिस चौकशी करत आहेत. या चौकशीतून दहशतवादी कट उघडकीस येतील, अशी पोलिसांना आशा आहे.