गाय मुखापासून जोतिबा मंदिरापर्यंत पायी वारी
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनामुळे चैत्र वारीला वाडी रत्नागिरी येथील जोतिबा देवाची गाठभेट झाली नसल्याने नार्वेकर गल्ली येथील भक्त मंडळी सोमवारी जोतिबा देवस्थानच्या भेटीला गेले. यात्रेप्रमाणेच पंचगंगा नदीवर स्नान व ढोल ताशाच्या गजरात गाय मुखापासून जोतिबा मंदिरापर्यंत पायी वारी काढण्यात आली.
गेल्या 55 वर्षांपासून नार्वेकर गल्ली येथील भक्त मंडळ जोतिबाच्या डेंगरावर जाते. दरवषी चैत्र पौर्णिमेला मोठय़ा उत्साहात यात्रा भरते. परंतु मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे यात्रा झाली नाही. ही प्रथा खंडित होवू नये, यासाठी वर्षाअखेरीस देवाची गाठभेट करण्यात
आली.
चैत्र पौर्णिमेप्रमाणेच सर्व धार्मिक विधी करण्यात आल्या. पंचगंगा नदीवर स्नान करून देवाला अभिषेक व नैवेद्य दाखविण्यात आला. गाय मुखाकडे देवाला पुन्हा अभिषेक करून सवाद्य ढोल-ताशाच्या गजरात जोतिबा मंदिरापर्यंत पायी वारी काढण्यात आली. मंदिरात देवाची गाठभेट तसेच इतर धार्मिक विधी पार पडल्या. यावेळी बेळगाव परिसरातील भक्त मंडळी उपस्थित होती.