किणये : नावगे येथील रामलिंग स्पोर्ट्स क्लब यांच्यावतीने आयोजित हाफपिच क्रिकेट स्पर्धेत जुने बेळगाव येथील गणेश स्पोर्ट्सने प्रथम क्रमांक, डब्ल्यूसीसी वाघवडे संघाने दुसरे तर एसआरएस हिंदुस्थान संघ, अनगोळने तिसरे स्थान मिळविले.
सदर स्पर्धा नावगेतील रामलिंग मंदिरासमोर प्रकाशझोतात घेण्यात आली. स्पर्धेमध्ये एकूण 60 संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम नुकताच पार पडला. अध्यक्षस्थानी बसवाणी मोटणकर होते. सातेरी कामती, संजय हणबर, पुंडलिक पायाण्णाचे, विश्वनाथ पाटील, मारुती हुरकाडली, मारुती हुंबरवाडी आदींच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. गावातील सुमारे 80 खेळाडूंना अभियंता सुरेश हुंबरवाडी यांनी टी शर्ट देणगी स्वरुपात दिले. बक्षीस कार्यक्रमाला बसाप्पा गवळी, गावडू पाटील, बबन पाटील, सहदेव मोटणकर आदी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रामलिंग स्पोर्ट्सच्या कार्यकर्त्यांसह गावातील इतर विविध संघांच्या कार्यकर्त्यांनीही सहकार्य केले..