प्रतिनिधी / नाशिक
अग्निशमन दलाचे जवान १० बंबासह घटनास्थळी दाखल झाले असुन आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागातील गंजमाळ परिसर आहे. दाट लोकवस्ती असलेली झोपडपट्टी एका घराला आग लागल्यावर ती काही वेळातच आसपासच्या घरांमध्ये पसरली. सिलिंडरचे स्फोट झाले असल्याचीही माहिती समोर येत आहे.