ऑनलाईन टीम / नाशिक :
नाशिकमध्ये मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाला आहे. आज सकाळी 7 वाजता विद्यार्थ्यांची बस धामणगावकडे जात असताना बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. त्यानंतर बस उलटली. या दुर्घटनेत 20 ते 22 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून, त्यांना पालिकेच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे.
नाशिक औरंगाबाद रोडवरुन मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना घेऊन बस धामणगावकडे जात होती. धामणगावजवळ बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. त्यानंतर बस पलटी झाली. या अपघातात बसमधील 20 ते 22 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून, त्यांनी प्रथमोपचारासाठी पालिकेच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे.
अपघातानंतर बसला धडक देणाऱ्या ट्रकचा चालक फरार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन ट्रक चालकाचा शोध सुरू केला आहे.