ऑनलाईन टीम/तरुण भारत
नाशिकजवळील लहवित – देवळाली स्थानकादरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनस- जयनगर एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरुन घसरल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या अपघातात काही प्रवासी जखमी, तर एकाच मृत्यू झाल्याचे समजत असून रेल्वे पोलिस, वैैद्यकीय पथक घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.
नाशिकहून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या लहवीत व देवळाली दरम्यान पवन एक्सप्रेसचे काही डब्बे रुळावरुन घसरलेत. रविवारी दुपारी 3.0 च्या सुमारास डाउन लाइनवर झालेल्या या अपघातात एका प्रवाशाचा बळी गेल्याची माहिती आहे. या घटनेत अन्यही काहीजण जखमी झालेत. ही रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनसहून जयनगर (दरभंगा)कडे जात होती. यावेळी हा अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात एकाच मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी 11.30 वाजता 11061 LTT-पवन एक्सप्रेस सुटली. दुपारी तीनच्या दरम्यान ही एक्सप्रेस नाशिकजवळील देवलाली येथे आली असता Dn मार्गावर अचानक रुळावरून दहा डब्बे घसरले. या अपघातात एकाच मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना लगतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.