ऑनलाईन टिम / नवी दिल्ली
NASA ची जेम्स वेबस्पेस टेलिस्कोप, आकाशगंगा तयार झाल्यापासून प्रथमच जगाला विश्वाची एक झलक देण्यासाठी तयार केली असून, दक्षिण अमेरिकेच्या ईशान्य किनारपट्टीवरून रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आली, या दुर्बीणमुळे खगोलशास्त्राच्या नवीन युगाची सुरुवात झाली आहे.
९ अब्ज डॉलरची किमतीची हि दुर्बिण NASA ने पुढील दशकातील प्रमुख अवकाश-विज्ञान वेधशाळा म्हणून गौरवलेली क्रांतिकारी इन्फ्रारेड दुर्बीण, युरोपीय अवकाशातून सकाळी ७.२९ वाजता च्या सुमारास Ariane5 कार्गो रॉकेटच्या सहाय्याने फ्रेंच गयाना मधील लाँच बेसवरून सोडण्यात आवकाशात सोडण्यात आले. अंतराळात २७ मिनिटांच्या प्रवासानंतर, १४,००० पौंड वजनाचे ही दुर्बिण फ्रेंच-बनावटीच्या रॉकेटच्या सहाय्याने सोडण्यात आले.
नवीन दुर्बिणीच्या प्राथमिक मिररमध्ये सोन्याचा मुलामा असलेल्या बेरिलियम धातूच्या 18 षटकोनी विभागांचा समावेश आहे शिवाय प्रकाशकिरणे गोळा करण्याची खूप मोठी ताकद असून. ज्यामुळे ते हबल किंवा इतर कोणत्याही दुर्बिणीपेक्षा जास्त अंतरावरील वस्तूंचे निरीक्षण करण्यास सक्षम करते. खगोलशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, यापूर्वी कधीही न पाहिलेल्या कॉसमॉसची एक झलक समोर येईल बिग बँगच्या केवळ 100 दशलक्ष वर्षांनंतरची, सैद्धांतिक फ्लॅशपॉईंट ज्यामुळे अंदाजे 13.8 अब्ज वर्षांपूर्वी निरीक्षण करण्यायोग्य विश्वाचा विस्तार सुरू झाला होता.